९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत

 


शूलपाणीएक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत

आठ डिसेंबर २०२४सकाळी आम्ही खलबुजुर्ग येथील सद्गुरू जोग महाराज आश्रमातून निघालोचिंचलीतील खेडापति हनुमान मंदिर आणि भोईंदा येथील संकटमोचन हनुमान मंदिरात थोडा विसावा घेतलात्यानंतर ब्राह्मणगावमार्गे जाऊन मंडवाडा येथील शिवमंदिरात रात्रीचा मुक्काम केला.

भोईंदा येथून निघताना एक गमतीदार घटना  घडली ती आधी सांगतो. तेथून निघताना मी मारुतीरायाला सहज हात जोडले आणि गंमत म्हणून म्हणालो तू पण चल माझ्या बरोबर. माझ्याकडे दोन बॅगा असल्यामुळे मी सर्वांच्या मागे पाय ओढत चालत असे. पण यावेळी काय झाले काय माहीत. माझी चालण्याची गती अचानक वाढली. मी वेगाने पुढे निघून गेलो. बाटेत दोन ठिकाणी चायप्रसादीसाठी बोलावले तिथे थांबलो. बडवानी जवळ आल्यावर रस्त्याच्याकडेला एका कट्ट्यावर थोडावेळ बसून आराम केला. पण; नवले महाराज आणि सत्संगी महाराज दिसत नव्हते, मोबाईलला नेटवर्कही नव्हते. अखेरीस मी बडवानी शहरात जो पहिला चौक लागला तेथे जाऊन त्यांची वाट पहात बसलो. तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. नवले महाराजांचा कॊल होता. त्यांनी विचारले; तुम्ही कुठे आहात? मी म्हटले बडवानीमध्ये चौकात वाट पहातोय ते थोड्यावेळाने तेथे पोहोचले. त्यांना वाटत होते मी मागेच कुठेतरी रेंगाळतोय. ही घटना मी जेव्हा श्री मैंद यांना सांगितली. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, मारुतीरायाने जादू दाखवली....

तर दहा डिसेंबरला आम्ही बडवाणी येथे पोहोचलोइथे सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थानमध्ये आमचा मुक्काम झालाबडवाणी हे जिल्ह्याचे शहर असूननर्मदा परिक्रमेच्या मार्गावरील अवघड शूलपाणी झाडीचा टप्पा सुरू होण्यापूर्वीचे हे सर्वात मोठे गाव आहे.

मी माझ्याकडील दोन मोठ्या बॅगांमुळे खूप हैराण झालो होतोपरिक्रमेसाठी घेतलेला दंड खांद्यावर टाकून त्यावर बॅग अडकवून चालावे लागत होतेआतापर्यंतचा रस्ता फारसा अवघड नव्हतापण यापुढे शूलपाणीची झाडी सुरू होणार होतीआता काय करायचेहा प्रश्न मला सतावत होतानवले महाराज म्हणाले, 'तुम्हाला आता नवीन बॅग घ्यावीच लागेलनाहीतर शूलपाणीतील अवघड डोंगरदऱ्यांतून चालणे शक्य होणार नाहीआपण बडवाणीमध्ये नवीन बॅग घेऊ.'

दहा तारखेला सायंकाळी आम्ही बडवाणीच्या सिद्धेश्वर मंदिरात पोहोचलोया आश्रमात नेहमीच प्रचंड गर्दी असतेपण व्यवस्थापन इतके सुरेख आहे की कोणतीही अडचण येत नाहीआम्ही आसने लावली आणि चालून थकून आलेल्या सत्संगी महाराजांना तिथेच थांबायला सांगून नवले महाराज आणि मी नवीन बॅग घेण्यासाठी बाहेर पडलोमार्केटमध्ये फिरता फिरता एका दुकानातून सैनिकांकडे असते तशा एका मोठ्या पोत्यासारख्या बॅगची खरेदी केली.

ती बॅग घेऊन आम्ही आश्रमात परत आलोया आश्रमाचे वैशिष्ट्य असे आहे की येथे परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येत असतातकोणी अॅक्युप्रेशरच्या साहाय्याने पायावर उपचार करताततर कोणी डॉक्टर औषधेगोळ्या देऊन मदत करतातएक सेवाधारी सज्जन परिक्रमावासींच्या बॅगांचे तुटलेले पट्टे आणि खराब झालेल्या चेन बदलून देण्याचे काम निशुल्क करत होते.

आम्ही  परतलो तेव्हा ते 'कोणाच्या बॅग दुरुस्त करायच्या आहेत का?' अशी विचारपूस करत फिरत होतेमाझ्याकडे असलेल्या सॅकची चेन कापडी पट्टीत अडकली होतीती त्यांनी सोडवून दिलीआता माझ्याकडे मोठी बॅग आल्यामुळे ती सॅक कोणा गरजूला देऊन टाकावी असा विचार माझ्या मनात आलामी त्या सेवाधाऱ्यांना म्हटलेकी 'ही सॅक कोणाला हवी असेल तर विचारामी नवीन बॅग घेतली आहे.'

तेव्हा त्यांनी माझ्या नव्या बॅगकडे नुसती नजर टाकली आणि म्हणाले"ही तुमची नवीन बॅग कुचकामी आहेतुम्ही सॅक कोणालाही देऊ नकाही तुमची नवीन बॅग पुढच्या प्रवासात तुटणार आहे."

आम्ही गप्प बसलोत्यांच्या सांगण्यानुसारमी माझी सॅक देण्याचा विचार रद्द केलानवीन बॅगमध्ये माझी सॅक टाकून दिलीदंडाला अडकवून खांद्यावर घेतलेले ओझे पाठीवर आल्यामुळे बरे वाटत होतेपण पुढे शूलपाणीचे जंगल आमची परीक्षा पाहणार होते.

निसर्गाची परीक्षा आणि माणसांचा चांगुलपणा

११ डिसेंबरला सकाळी आम्ही बडवाणीतून बाहेर पडलोशहरातून दोन-तीन किलोमीटर बाहेर आल्यावर सत्संगी महाराज लघुशंकेसाठी थांबलेत्यांनी आपली मैयाची पिशवी एका झाडावर अडकवून ठेवली आणि ती तिथेच विसरून ते आमच्याबरोबर चालू लागले.

सुमारे एक-दोन किलोमीटर पुढे आल्यावर मागून एक तरुण मोटरसायकलवाला आणि त्याची धाकटी बहीण आलेत्यांनी आम्हाला थांबवून सत्संगी महाराजांच्या हातात त्यांची मैयाची पिशवी दिली आणि म्हणाले, 'महाराजतुम्ही मघाशी जिथे थांबला होताततिथेच पिशवी विसरून आलात.' सत्संगी महाराजांनी पिशवी घेतलीत्यांचे आभार मानलेते निघून गेल्यावरसत्संगी महाराजांनी रडण्यास सुरुवात केलीआम्ही त्यांची समजूत काढत 'आता शांत व्हापिशवी मिळाली ना परतअसे सांगत त्यांना सोबत घेऊन चाललो.

त्या दिवशी आम्ही बोरखेडीला अन्नक्षेत्रात मुक्काम केलाभरपूर गर्दी होतीजागा अपुरी पडत होतीचारी बाजूने उघड्या असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही आसने लावलीआश्रमासमोरच रात्री मुक्कामाला आलेली एक बस थांबली होतीपहाटे अचानक धावपळ सुरू झालीएका महिलेला दोन-तीन धडधाकट माणसे हातावर उचलून घेऊन आली आणि तिला बसमध्ये ठेवलेसमजले की ती महिला परिक्रमेत होतीपण शूलपाणीतील अवघड पायवाटेवर तिचा तोल जाऊन पडली आणि; तिचा पाय मोडलाझाडीतील नागरिकांनी तिला कसेबसे बोरखेडीपर्यंत आणले होतेतिला उपचारासाठी बडवाणीला नेले जाणार होते.

या घटनेमुळे वाईट वाटलेपण त्याचबरोबर झाडीतील नागरिकांबद्दल आदरभाव दुणावलाएकेकाळी जिथे परिक्रमावासींची लूट होत होतीअंगावरील कपडेही काढून घेतले जात होतेतिथे आता त्यांची सेवा होत आहेयाचे श्रेय घोंगसा येथील थोर संत लखनगिरी महाराज यांना जातेत्यांनी चिकाटीने प्रयत्न करून ही परिस्थिती बदलली.

या गडबडीमुळे आमची झोप उडालीजवळच मय्याचे बॅकवॉटर होतेत्यात स्नान केलेपूजा केली आणि चहा घेऊन आम्ही पुढे चालू लागलोया मार्गावर वसलेले कुली हे बससेवा असलेले शूलपाणीच्या झाडीतील शेवटचे गाव आहेतेथे आम्ही पोहोचलोघोंगसा येथे असलेल्या लखनगिरी महाराजांच्या आश्रमाला भेट दिलीआश्रमाचे महंत नर्मदागिरी महाराजांना नमस्कार केलालखनगिरी महाराजांची समाधी आता नर्मदेच्या बॅकवॉटरमध्ये गेली आहेवरचा काही भाग दिसत होतादुरूनच त्यांच्या समाधीला हात जोडले.

दुपारची भोजनप्रसादी घेऊन आम्ही पुढे निघालोत्या दिवशी आमचा मुक्काम सेमलेट येथे पडलातेथील सरपंच आणि किराणा दुकानदार सदावर्त देतातयेथील धर्मशाळेत इतकी गर्दी झाली होती की आसने लावायला जागाच नव्हतीशेवटी आम्हाला बाजूच्या शाळेतील एक वर्ग उघडून देण्यात आलातिथे आम्ही आमची आसने लावलीसदावर्त असल्यामुळे स्वयंपाक करणे आवश्यक होतेपणआमच्याकडे भांडी नव्हती आणि एकच चूल होतीत्यावर स्वयंपाक करणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होतीत्यामुळे आम्ही स्वयंपाक करण्याचा बेत रद्द करून आमच्याकडे असलेल्या खाद्यपदार्थांवर ती रात्र काढलीसकाळी लवकर उठून आम्ही पुढे निघालो.


 Marathi literature, Narmada Parikrama, spiritual journey, travelogue, personal narrative, divine connection, selfless service, Shulpani jungle

#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #Shulpani #FaithAndDestiny #Pilgrimage #DevotionalStory #Humanity #Transformation #NarmadaMaiya

 

-------------------------------

नर्मदा परिक्रमानिसर्गसाहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

 नर्मदा परिक्रमा : नर्मदे हरएक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

 नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

 नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

 नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html

 नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरपरिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html

 नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html

 नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडेएक आनंददायी अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html

मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिरएक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html

 नर्मदा परिक्रमा : खलघाटसेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html

 नर्मदा परिक्रमा : शूलपाणीएक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html

----------------------------------


Post a Comment

Previous Post Next Post