५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

 


ओंकारेश्वरपरिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

मागील लेखात आपण पाहिल्याप्रमाणेगावाहून वडीलधाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन मी नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी सज्ज झालो होतो डिसेंबरला पुण्याहून खांडव्याकडे रवाना झालो आणि पहाटेच ओंकारेश्वरला पोहोचलोमांधाता परिक्रमा पूर्ण करून मी रात्री आश्रमात परतलोआणि थोड्याच वेळात रात्रीच्या भोजनाची वेळ झाली.

नवले सरमी आणि आमच्या बाजूला उतरलेले पुणे परिसरातील आणखी काही परिक्रमावासी आम्ही भोजन करण्यासाठी गेलोपरिक्रमेच्या पहिल्या दिवसाचा प्रसाद घेतानाचनवले सरांनी माझ्याकडे असलेल्या दोन बॅगा पाहिल्या. 'तुमच्याकडे फारच जास्त वजन आहेते कमी करण्याला पर्याय नाहीदोन बॅगा घेऊन चालणे फारच अवघड होईलअगदी पहिल्या टप्प्यातओंकारेश्वरमधून बाहेर पडल्यावर मोरटक्क्याला जाईपर्यंत तुम्ही थकून जाल,' ते म्हणाले.

नर्मदा परिक्रमेला किती सामान न्यावे याची मला नेमकी कल्पना नव्हतीऐकीव आणि वाचलेल्या माहितीवर आधारित मी तयारी केली होतीसुमारे पंचवीस किलो वजनाच्या दोन बॅगाएक पाठीवरची सॅक आणि दुसरी एक एअरबॅगत्यातील एअरबॅग तर फारच जड होतीमाझ्या मनात एक विचार होता कीजिथे मुक्काम करू तिथे आपले भोजन आपणच तयार करूम्हणून मी एक छोटे पातेलेत्याची वेळणीमोठा चमचा आणि थोडे डाळ-तांदूळ वगैरे साहित्य सोबत घेतले होतेयाशिवायमाझ्याकडे असलेल्या काही आयुर्वेदिक औषधींच्या बाटल्याही मी सोबत घेतल्या होत्याजेणेकरून मला किंवा माझ्या सहपरिक्रमावासींना गरज लागल्यास त्या उपयोगी पडतीलआता या सामानाचे काय करायचे याची चिंता मला लागली होतीहा विचार करता करताच केव्हातरी मला झोप लागली.

पहाटे लवकर मला जाग आलीनवले सरही जागे झाले होतेआम्ही मुखमार्जनादी प्रातर्विधी उरकले आणि ओंकारेश्वराच्या गोमुख घाटाकडे निघालोतारीख होती  डिसेंबर २०२४सकाळची वेळ शांत होतीअजून बरेचसे ओंकारेश्वर साखरझोपेत होतेआश्रमापासून थोडे अंतर पुढे गेल्यावर मला एक महिला दिसलीती बाजूच्या झोपडपट्टीत राहणारी असावीमी तिला हाक मारली, 'मैयाजीरुको.' आणि माझी बॅग खाली ठेवून त्यातील किराणा सामान बाहेर काढले आणि ते सर्व तिला देऊन टाकलेथोडे ओझे कमी झालेपण तरीही बोजा जास्त होताच.


पहिल्या टप्प्यातील ’चायप्रसादी’

संकल्पाची पहाट आणि ओट्यांचे गूढ

आम्ही घाटावर पोहोचलोरात्री नवले सरांनी संकल्पपूजा सांगणारे अनिलदास महाराज यांच्याशी संपर्क साधला होतात्यामुळे आम्ही त्याबाबतीत निश्चिंत होतोएकदा संकल्प उचलल्यावर पुन्हा आश्रमात परतायचे नसतेतिथूनच सरळ परिक्रमेला पुढे निघावे लागतेम्हणून आम्ही आमच्या बॅगा घेऊनच घाटावर आलो होतोतिथे नुकतीच एक-दोन दुकाने उघडली होतीमला परिक्रमेसाठी आवश्यक असलेला दंड (काठीआणि कमंडलू (पाण्यासाठीचा डबाखरेदी करायचा होतामी एका दुकानातून ते दोन्ही घेतले.

संकल्पपूजा करण्यापूर्वी क्षौरकर्म (मुंडणकरणे आवश्यक होतेपण केस कापणारा माणूस आलेला नव्हताथोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तो घाईघाईत आला आणि त्याने अक्षरशः म्हशी भादरतात त्याप्रमाणे आम्हा सर्वांची डोकी तासून टाकलीत्यानंतर आम्ही कडाक्याच्या थंडीत नर्मदेच्या जलात डुबकी मारली आणि परिक्रमेचा गणवेशपांढरी कोपरी आणि पंचानेसून अनिलदास महाराजांची वाट बघत बसलो.

थोड्या वेळाने ते आलेआम्ही साधारण पंधरा-वीस जण होतोसर्वांना रांगेत बसवले गेले आणि संकल्पपूजा झालीकन्यापूजनासाठी तिथे सात-आठ छोट्या कन्या आल्या होत्यात्यांना यथाशक्ती खाऊ देऊन आम्ही निघण्यासाठी तयार झालोत्या कन्याही निघून गेल्यातेवढ्यात मी नवले सरांना थांबवून म्हटले, 'दोन मिनिटांत येतो.' आणि मी माझ्याकडे असलेल्या दोन ओट्या घेऊन त्या मातेला अर्पण करण्यासाठी घाटावरच्या पाण्याजवळ गेलो.

काही लोक पुढे निघून गेल्यामुळे घाट हळूहळू मोकळा होऊ लागला होतामी पाण्याजवळ गेलो आणि पहिल्या पायरीवर उतरलोमी पहिली ओटी काढलीतोच मागून एक आवाज आला'बाबाजीये मुझे दे दो.' मी मागे वळून पाहिलेतिथे एक दहा-अकरा वर्षांची छोटी मुलगी उभी होतीतिच्या अंगावर हिरवे कपडे होते आणि तिने लाल कुंकू लावले होतेमला तो शुभ शकुन वाटलामी तिला म्हटले, 'मैयाजरा रुकोइसे जलस्पर्श करके तुम्हे देता हूं.' मी नर्मदेच्या पाण्याला स्पर्श करून ती ओटी तिच्या हातात ठेवलीतिने दोन्ही हात पुढे करून ती स्वीकारली.

त्यानंतर मी माझ्या पिशवीतून दुसरी ओटी काढली आणि तीही अर्पण करू लागलोतेव्हा ती पुन्हा म्हणाली'बाबाजीये भी मुझे दे दो.' मी पुन्हा तसेच केलेजलाला स्पर्श करून ती ओटीही तिला दिली आणि हात जोडले.

 


सामानाचा त्याग आणि परिक्रमेचे पहिले पाऊल

मी वरती आलोनवले सर माझी वाटच बघत उभे होतेआम्ही आमच्या बॅगा उचलल्यादंड हातात घेतला आणि परिक्रमेच्या पहिल्या टप्प्याकडे निघालोघाटावरून पन्नास-साठ पायऱ्या चढून परिक्रमा मार्गावर जावे लागतेत्या चढून आम्ही निघालोमाझ्याकडचे ओझे इतके जास्त होते की ते आता त्रास देऊ लागले होते.

साधारण चार-पाचशे मीटर दूर गेल्यावर एक आवाज आला, 'नर्मदे हरबाबाजीरुकोचाय पा लो.' एका चहाच्या टपरीवर एक बाबा उभे होतेत्यांनी आम्हाला थांबवलेनवले महाराजांना ते परिचित होते. (आता आम्ही अधिकृत परिक्रमावासी झालो होतो.) ते बाबा दक्षिण भारतातील होते आणि नर्मदा किनारी येऊन राहिले होतेते परिक्रमेला जाणाऱ्या सर्वांना चहा पाजतातअशी माहिती नवले महाराजांनी मला दिली.

नवले महाराज विसावा घेताना

चहा घेताना आमची पुन्हा वजनावर चर्चा झालीनवले महाराज म्हणाले, 'वजन कमी करायलाच हवे.' आम्ही थोडे पुढे गेलोतिथे एक महिला हातगाडी लावून चणे-फुटाणे विकत बसली होतीतिच्या बाजूलाच एका झाडाचा पार होतात्या पारावर मी बॅग ठेवली आणि त्यातील पातेलेझाकण आणि आयुर्वेदिक औषधांच्या बाटल्या काढून तिला देऊन टाकल्याथोडा भार कमी झालापण तरीही वजन जास्तच होतेशेवटी मी हातातला दंड खांद्यावर घेतला आणि त्याला बॅग अडकवून चालायला सुरुवात केली.

सुरुवातीचा काही टप्पा तसा चालायला अवघड होताखाचखळग्यांतूनचढ-उतारावरून चालत आम्ही थोडे अंतर पार केलेजंगलात एका महाराजांची कुटी होतीत्यांनी 'नर्मदे हरकरत चहासाठी बोलावलेपुन्हा माझ्या सामानाची चर्चा सुरू झालीते महाराज म्हणाले, 'इतना ज्यादा सामान लेके कैसे चल पाओगेकुछ तो सामान कम करो!'

आता काय कमी करता येईल याचा विचार करूनशेवटी मी जे कपडे अंगावर घालून आलो होतोते शर्ट आणि पॅन्ट तिथेच सोडून दिलेआता माझ्याकडे फक्त दोन परिक्रमेचे गणवेशदोन पंचेअंथरूण-पांघरूण आणि पूजेचे सामान उरले होतेया पूजेच्या सामानात नर्मदा पुराणगजानन विजय ग्रंथ आणि इतर साहित्य असल्यामुळे त्याचा भार मोठा होतापण ते सामान आता सोडणे शक्य नव्हते.

चहा घेऊन झाल्यावर आम्ही पुढे निघालोपुढे पुन्हा एक आश्रम लागलात्यांनी आम्हाला भोजनप्रसादीसाठी थांबवलेया सगळ्या गडबडीत एक तासभर गेला आणि आम्ही पुन्हा चालायला लागलोआता जंगलातून बाहेर आलो होतो आणि नर्मदा नदीच्या खडकाळ किनाऱ्यावरून चालणे सुरू झाले होते.

ती कोण होती?

इतक्यात मला श्रीमैंद यांचा फोन आलात्यांनी मला विचारले, 'काय घडले?' मी त्यांना सकाळी गोमुख घाटावर आल्यापासूनची सर्व माहिती सांगितलीहे ऐकून ते हसले आणि म्हणाले, "त्या मुलीला नमस्कार केलात का?" मी 'हात जोडलेअसे सांगितलेते पुन्हा हसले आणि म्हणाले, "पायाला हात लावून नमस्कार केलात का?" मी 'नाहीम्हटले.

ते म्हणाले, "अहोप्रत्यक्ष मय्याने येऊन तुमच्याकडून ओट्या स्वीकारल्यापण तुम्ही तिच्या चरणांना स्पर्श केला नाही!" तेव्हा माझ्या लक्षात आलेकी अरे होखरे तर पायाला हात लावून नमस्कार करायला हवा होतामी जसजसा विचार करत गेलोतसतसे मला लक्षात आले की कन्यापूजेसाठी आलेल्या मुली कधीच निघून गेल्या होत्यामी पायऱ्या उतरून शेवटच्या पायरीपर्यंत येईपर्यंत माझ्या मागे कोणीही नव्हतेअचानक ही मुलगी कुठून आलीशिवायती कन्यापूजनासाठी आलेल्या मुलींपेक्षा अधिक तेजस्वी दिसत होती आणि तिचे कपडेही स्वच्छ होतेतिचे राहणीमान चांगले होतेहे सर्व लक्षात आल्यावर मला पश्चात्ताप होत होतापण वेळ निघून गेली होती.

आमचे बोलणे होईपर्यंत नवले महाराज आणि आमच्याबरोबर असलेले इतर दोघेजण पुढे निघून गेले होतेमी मागे राहिलोते पुढे गेल्यावर मी रस्ता चुकलो आणि नर्मदेच्या पात्रातील दगड-गोट्यांवरून चालत राहिलोखूप वेळाने नवले महाराजांचा मला फोन आलाते म्हणाले, "कुठे आहात?" मी म्हटले, "चालतोयरस्ता चुकल्यासारखं वाटतंय." त्यावर ते म्हणाले, "आम्ही आता मोरटक्क्याजवळ आलो आहोततुम्ही या."

मी संध्याकाळ होत होत मोरटक्क्याला पोहोचलोत्या दिवशी आमचा मुक्काम तिथेच झालानर्मदा परिक्रमेतला हा पहिला मुक्कामआत्तापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटलाहे जरूर कळवा

Marathi literature, spiritual journey, travelogue, Narmada Parikrama, divine synchronicity, personal narrative, faith, pilgrimage 

 #NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DivineBlessings #FaithAndDestiny #Pilgrimage #Omkareshwar #NarmadaMaiya #LifeChangingJourney


मागील भाग वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

नर्मदा परिक्रमानिसर्गसाहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

 नर्मदा परिक्रमा : नर्मदे हरएक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

 नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

 नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

 नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html



Post a Comment

Previous Post Next Post