७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव

 


शालिवाहनकडेएक आनंददायी अनुभव

आजसहा डिसेंबर २०२४सकाळी आम्ही आमची आन्हिके आटोपलीमैयाची पूजा केली आणि आमचे गाठोडे घेऊन बाहेर पडलोथंडी चांगलीच होतीथोडे धुकेही होतेपण थोडे चालल्यावर अंगात उब आलीआज आम्ही शालिवाहनपर्यंत जाणार होतो आणि बहुतांश रस्ता मैयाच्या किनाऱ्याने होतानदीकिनारील खाचखळगे नसलेली वाट मिळालीतर तो 'अवघा आनंदचअसतोआणि आजची वाट तशीच होतीत्यामुळे आम्ही मजेत चाललो होतो.

मांडव्य ऋषी गुंफ़ा

वाटेत एक-दोन ठिकाणी चहाचा प्रसाद मिळालाअकरा-साडेअकराच्या सुमारास आम्ही बडगाव येथील मांडव्य ऋषींच्या गुंफ़ेजवळ पोहोचलोगुंफ़ेच्या आधी असलेल्या एका हॉलमध्ये खूप गर्दी होतीकाही वाहनेही होतीचौकशी केली असता, 'विवेकजीनावाचे साधू त्यांच्या भक्तमंडळींसोबत परिक्रमा करत असूनत्यांची यात्रा लवकरच इथे पोहोचणार होतीत्यांच्या भोजनाची आणि इतर व्यवस्थेची लगबग चालू होतीएकूणच ते दादागुरूंसारखेच मोठे साधू असावेत.

आम्ही मांडव्य ऋषींच्या गुंफ़ेपर्यंत पोहोचलोयेथील बरीचशी व्यवस्था पुण्यातील  काही व्यक्ती पाहतात असे समजलेगुंफ़ेशेजारीच आश्रम आहेआम्ही पाठीवरील बॅगा उतरवून ठेवल्याहातपाय स्वच्छ धुवून आलोआश्रमात फारशी वर्दळ दिसत नव्हतीमहंतांचेही दर्शन झाले नाहीमग तेथे असलेल्या एका सेवेकऱ्याला विचारून आम्ही गुंफ़ेत प्रवेश केलाआत जाऊन पुरुषसूक्त आणि श्रीसूक्ताचा पाठ केलाबाहेर येऊन थोडा वेळ टेकलोजवळून मैया वाहत असल्यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न वाटत होते.

महंतांचे दर्शन आणि भोजनप्रसादी

तेवढ्यात आश्रमाचे महंत मैयाकडून आलेमैयाला नैवेद्य दाखवायला गेले असावेतते तरुण होतेआम्हाला पाहताच प्रसन्न हसत 'नर्मदे हरम्हणालेपाच मिनिटांतच सेवेकऱ्याने 'भोजन की सितारामअशी हाक दिलीआम्ही भोजनप्रसादी घेण्यासाठी गेलोवाढताना महंत म्हणाले, "आज आश्रमात हा सेवेकरी आणि मी असे दोघेच आहोतबाकी कोणी नाहीत्यामुळे आम्ही जे भोजन तयार केले आहेत्यात काही कमी-जास्ती असेलतर सांभाळून घ्या."

आता याला काय म्हणावेआमच्यासारख्या अनोळखी लोकांना जेवण द्यावे आणि वर कसलेही कारण नसताना क्षमायाचनाही करावीखरे संत नेहमीच विनयशील असतातहे महंत त्याचे मूर्तिमंत उदाहरण होतेभोजनोत्तर थोडा सत्संग झाला आणि त्यांनी आम्हाला परिक्रमेबाबत काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केलीसायंकाळच्या सुमारास शालिवाहन येथे पोहोचलो. पलिकडच्या तिरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी महेश्वर आहे, तिथला घाट फ़ार सुंदर दिसत होता. तिथे जेव्हा पोहोचू तेव्हा तो नीट पाहता येईल. आता शालिवाहन येथे आहोत.  ज्या ठिकाणाहून शालिवाहन शक सुरू झालेते हेच ठिकाणयेथे हजारो वर्षांपूर्वीचे शिवलिंग आहेदिवंगत खासदार अनिल माधव दवे यांच्या प्रयत्नातून तेथे उभारण्यात आलेली एक धर्मशाळा आहेत्याला लागूनच आश्रमही आहेआम्ही त्या धर्मशाळेत आसने लावलीमंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आश्रमात येऊन मैयाची सायंपूजा केली.

अहिल्यादेवींचे महेश्वर

शालिवाहन येथील रात्र आणि नवा दिवस

सात-साडेसातच्या सुमारास 'भोजन की सितारामझालीभोजन करून आम्ही आमच्या आसनावर येऊन बसलोआश्रमात चांगलीच गर्दी होतीमी माझ्याकडे असलेले काही अतिरिक्त सामान या आश्रमात कमी केले.

रात्री आश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्या महाराजांना मंदिर सकाळी किती वाजता उघडेल असे विचारलेत्यावर ते म्हणाले"मंदिर कधीच बंद होत नाहीचोवीस तास उघडे असते." सकाळी रुद्रपाठ करण्यासाठी त्यांची परवानगी घेतलीत्यांनीही ती मोठ्या खुशीने दिलीअंथरुणावर येऊन आडवा झालो आणि झोप कधी लागली ते कळलेही नाही.

पहाटेच

हा भाग कसा वाटलाते जरूर कळवा.

Marathi literature, spiritual journey, Narmada Parikrama, travelogue, personal narrative, divine connection, faith 

#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DivineGuidance #FaithAndDestiny #Pilgrimage #MandavyaRishi #Shalivahan #DevotionalStory


-------------------------------

आधीचे लेख

नर्मदा परिक्रमानिसर्गसाहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

 नर्मदा परिक्रमा : नर्मदे हरएक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

 नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

 नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

 नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html

 नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरपरिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html

 नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html

----------------------------------


Post a Comment

Previous Post Next Post